शेतीत नवनवीन प्रयोग होत आहेत. आजचा तरुण वर्ग शेतीकडे अर्थार्जनाचे साधन म्हणून पाहू लागला आहे. पारंपरिक पद्धतीस फाटा देत आजचा तरुण विविध नवनवीन तंत्रज्ञांचा वापर शेतीमध्ये करत आहे.
पुण्यात राहणारा अक्षय फराटे हा शेतकरी यापैकी एक. त्याने YouTube वरून कांदा लागवडीची नवीन पद्धत आत्मसात केली. त्यातून त्याने भरघोस उत्पन्न मिळवले. चला जाणून घेऊयात..
अक्षयने मल्चिंग पेपर तंत्राचा वापर केला. याद्वारे कांद्याची लागवड करून लाखोंचा नफा तो कमवत आहे.
तण नियंत्रणासाठी ही पद्धत प्रभावी
तज्ज्ञांच्या मते, मल्चिंग पद्धतीने लागवड केल्यास तणांचे नियंत्रण होते. ते दूर करण्यासाठी कीटकनाशकांचा खर्च कमी होतो आणि झाडे दीर्घकाळ सुरक्षित राहतात.
दोन एकर क्षेत्रात कांदा लागवड
एका रिपोर्टनुसार अक्षय दोन एकर जमिनीत कांद्याची लागवड केली. या शेतीसाठी त्यांना सुमारे 50 हजार रुपये खर्च करावे लागले. त्यांना एकरी 8 ते 9 टन उत्पादन मिळत आहे. देशातील 40 टक्के कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रात होते.
मल्चिंग पद्धतीने शेती करण्याचे दोन मार्ग
तण आणि वारंवार पाणी देणे यांसारख्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे तंत्र विकसित करण्यात आले. या पद्धतीत, बेड पूर्णपणे प्लास्टिकने झाकलेले असते, जेणेकरून शेतात तण राहणार नाही. तसे, मल्चिंग पद्धतीने शेती करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे जैविक मल्चिंग. यात पेंढा, पाने इत्यादींचा वापर केला जातो. याला नैसर्गिक मल्चिंग देखील म्हणतात, ते खूप स्वस्त आहे. झिरो बजेट शेतीमध्येही याचा वापर होतो. दुसरी पद्धत म्हणजे प्लास्टिक मल्चिंग बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये बेडवर प्लास्टिकचा वापर केला जातो. हे सेंद्रिय मल्चिंगपेक्षा महाग आहे. पण झाडांना पूर्ण संरक्षण यामुळे मिळते.