बातम्याकौतुकास्पद ! अदानी समूह 2030 पर्यंत लावणार 100 दशलक्ष झाडे

कौतुकास्पद ! अदानी समूह 2030 पर्यंत लावणार 100 दशलक्ष झाडे

spot_img
spot_img

अदानी समूह हा भारतातील वैविध्यपूर्ण व्यवसायांचा सर्वात मोठा ग्रुप आहे. या समूहाला ओळखत नाही असा कुणी सापडणे मुश्किल आहे. आता या ग्रुपने एक मोठा निर्णय घेतला आहे. या ग्रुपने आता 2030 पर्यंत 10 कोटी रोपे लावण्याचा संकल्प केला आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ट्रिलियन ट्रीज प्लॅटफॉर्म 1t.org वर हा ठराव घेण्यात आला.

2030 पर्यंत 100 मिलियन झाडे लावण्याची अदानी समूहानेकेलेली प्रतिज्ञा खरोखर कौतुकास्पद आहे.
या झाडांमध्ये खारफुटी तसेच स्थलीय झाडांचा समावेश असेल, असे अदानी समूहाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले, एक ट्रिलियन झाडे लावण्याची महत्त्वाकांक्षा खूप प्रेरणादायी आहे. ते मानवतेच्या लवचिकतेचे प्रतिबिंब आहे. समविचारी लोकांच्या सामूहिक सामर्थ्याद्वारे, हे मोठे साध्य नक्कीच गाठू.
ते म्हणाले, परिसंस्था पुनर्संचयित करणे, जैवविविधतेची हानी कमी करणे, मातीची धूप कमी करणे हे हरित जग निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. त्यानुसार आमचा प्रयत्न असणार आहे.

ताज्या बातम्या

सरकारी योजना