कृषीGuava Farming : 'जपानी रेड डायमंड' पेरूची लागवड करा अन लाखो कमवा,जाणून...

Guava Farming : ‘जपानी रेड डायमंड’ पेरूची लागवड करा अन लाखो कमवा,जाणून घ्या सविस्तर माहिती

spot_img
spot_img

भारत शेतीप्रधान देश आहे. सध्या शेतकरी भात, गहू, मका यासारख्या पारंपरिक पिकांचे उत्पादन घेत आहेत. परंतु सध्या शेतकरी फळबागांकडेही वळले आहेत.

आज आपण याहीपेक्षा चांगले पैसे कमवू शकतात. आज आपण या ठिकाणी पेरूच्या ‘जापानी रेड डायमंड’ या पेरूच्या लागवडीबद्दल पाहणार आहोत. हे दिसायला जितके शानदार असतात तितकेच कमाई देखील जास्त देतात.

जपानी रेड डायमंड पेरू
जपानी रेड डायमंड पेरूची लागवड देशात वाढली आहे. रेड डायमंड पेरूच्या शेतीत नफा कमवायचा असेल, तर त्यासाठी योग्य ती माहिती समजून घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यातून वर्षाला लाखो रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.

हवामान, माती कशी असावी ?
जपानी रेड डायमंड पेरूची लागवड करण्यास शेतकरी प्राधान्य देतात. 10°C ते 42°C तापमानात चांगले उत्पादन मिळू शकते. या पिकाच्या उत्पादनासाठी माती काळी , वालुकामय चिकणमाती चांगली समजली जाते. जमिनीचा पीएच 7 ते 8 असावा.

किती अंतरांवर झाडांची लागवड करावी ?
जपानी डायमंडची लागवड करताना दोन झाडांमधील अंतर योग्य असले पाहिजे. दोन ओळीत 8 फूट आणि दोन रोपांमध्ये 6 फूट अंतर असावे. रोपाच्या योग्य वाढीसाठी वर्षातून दोनदा छाटणी करावी. तज्ज्ञ असेही सांगता की, जर पेरू चिकूच्या आकाराचे झाले तर ते फोम बॅग किंवा वर्तमानपत्राने झाकून ठेवावे. त्यामुळे पेरू चांगला पिकतो अन त्यावर डाग लागत नाहीत.

खत, सिंचन
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल के याला खत कसे वापरावे ? पाणी कसे द्यावे? तर शेणखत,वर्मी कंपोस्ट वापरणे चांगले. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. याशिवाय एनपीके सल्फर, कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट, बोरॉन यांचा वापर रासायनिक खतांमध्ये करता येतो. झाडाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन चांगले आहे. अन्यथा, सामान्य सिंचन वेळेवर करणे आवश्यक आहे.

किती होईल कमाई
जपानी लाल डायमंड पेरू दिसायला टरबूजासारखा लाल आणि नाशपातीसारखा गोड असतो. जिथे देशी पेरू 50 ते 60 रुपये किलोने बाजारात विकला जातो तिथे जपानी रेड डायमंड पेरू 100 रुपये किलोपर्यंत विकला जाऊ शकतो.

ताज्या बातम्या

सरकारी योजना