बातम्यासूर्य आग ओकतोय, फेब्रुवारीतच इतके वाढले तापमान, शेतकऱ्यांना इशारा

सूर्य आग ओकतोय, फेब्रुवारीतच इतके वाढले तापमान, शेतकऱ्यांना इशारा

spot_img
spot_img

उत्तर भारतासह देशातील अनेक भागांत फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळा सुरू झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात, राजस्थान, गोवा आणि कर्नाटकमध्ये कमाल तापमान ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान राहिले, जे सरासरीपेक्षा ४-५ अंशांनी जास्त आहे. तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडबद्दल बोलायचे झाले तर येथील कमाल तापमान २३ ते २८ अंशांच्या दरम्यान आहे. तर पंजाब, हरयाणा, दिल्लीत कमाल तापमान २८ ते ३३ अंशांच्या दरम्यान नोंदले जात आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य भारतातील अनेक भागात पुढील तीन दिवस कमाल तापमान सरासरीपेक्षा ५ ते ७ अंशांनी अधिक राहणार आहे. तापमानातील वाढ लक्षात घेता हवामान खात्याने पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिवसा जास्त तापमानामुळे गहू पिकाचे नुकसान होऊ शकते. गव्हाचे पीक पिकायला तयार आहे. अशा वेळी जास्त तापमानामुळे पिकाचे नुकसान होऊ शकते.

शेतकऱ्यांसाठी सल्ला
हवामान खात्याने पुढील पाच दिवसशेतकऱ्यांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. वाढत्या तापमानापासून पिकाचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना हलके सिंचन करण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर जमिनीतील ओलावा आणि तापमान टिकवून ठेवण्यासाठी बेडच्या मधोमध ओला घास सारख्या गोष्टी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

उष्णतेच्या लाटेबद्दल काय आहे अपडेट?
हवामान खात्याने रविवारी कोकण आणि महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेचा इशारा दिला होता. मात्र, नंतर हवामान खात्याने हा इशारा मागे घेतला. दरम्यान, हवामान खात्याने सोमवारी रात्री उशिरा प्रसिद्धीपत्रकाद्वारे या भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा ४ ते ९ अंशांनी अधिक असल्याचे म्हटले आहे.

शेतकऱ्यांना इशारा :
उष्णतेत वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना इशारा देण्यात आला आहे. शेतात उभी असलेली पिके करपण्याची भीती आहे. त्यामुळे पिकास थोडे थोडे पाणी देणे गरजेचे आहे. तसेच गर्व आणि ओलावा टिकून राहील यासाठी पिकाच्या मुळांशी,बुंध्यांशी घास, पाचारट आदी टाकणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

सरकारी योजना