बातम्याशेवग्याची शेती करून हजारो कमवा, त्याचे चमत्कारिक फायदे पाहून अशचर्यचकित व्हाल

शेवग्याची शेती करून हजारो कमवा, त्याचे चमत्कारिक फायदे पाहून अशचर्यचकित व्हाल

spot_img
spot_img

भारत हा शेवग्याचा सर्वात मोठा उत्पादक देश असून त्याचे वार्षिक उत्पादन १.१ ते १.३ मिलियन टन आहे. शेवग्याचे झाड अतिशय वेगाने वाढते आणि त्याच्या शेंगांसह त्याची पाने आणि फुले देखील पदार्थांमध्ये वापरली जातात.

शेवग्याचे फायदे :
– शेवग्याची साल आणि पानांमध्ये अँटी कॅन्सर आणि अँटी ट्यूमर गुणधर्म असतात. याव्यतिरिक्त, पानांमध्ये पॉलीफेनोल्स आणि पॉलीफ्लोनोइड्स समृद्ध असतात, जे अँटीऑक्सिडंट्स आणि कर्करोगविरोधी संयुगे आहेत.
– मधुमेहासाठी सहजन बीन्स, साल आणि इतर भागांमध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म असतात, जे मधुमेहासाठी फायदेशीर ठरू शकतात.
– शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. तसेच शेंगेत लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.
-शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते.
-नियमित सेवन केल्यामुळे शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण वाढते आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते.
-शेवग्याच्या शेंगेचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो.

मागणी
या वरील फायद्यांमुळे शेवग्याची मागणी बाजारात प्रचंड वाढली आहे. त्यामुळे ही शेती करून आता चांगली कमाई करू शकतात. हे जवळपास वर्षभर चालणारे पीक आहे. त्यामुळे बाजार कमी अधिक झाला तरी यातून कमाई होऊ शकते.

ताज्या बातम्या

सरकारी योजना