आर्थिकPM kisan samriddhi kendra: शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी मिळणार शेतीची माहिती, वस्तू व...

PM kisan samriddhi kendra: शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी मिळणार शेतीची माहिती, वस्तू व रोजगार, पहा मोदी सरकारची ही योजना

spot_img
spot_img

देशातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या सुधारण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांवर “वन नेशन वन फर्टिलाइजर स्कीम” अंतर्गत शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे, कीटकनाशके सोबतच अनेक प्रकारच्या कृषी यंत्रसामग्री मिळतील. शेतकऱ्यांना ही कृषी यंत्रे भाड्यानेही घेता येणार आहेत.

प्रधानमंत्री किसान समृद्धि केंद्र उद्देश्य
शेतकऱ्यांना येथे सहज पोहोचता यावे यासाठी मंडईभोवतीच प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांमधून शेतकऱ्यांना भारत ब्रँडची खते सहज खरेदी करता येणार आहेत.
प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रात शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राशी संबंधित विविध योजनांची माहिती मिळणार आहे. या माध्यमातून शेतकरी एकाच ठिकाणाहून बी-बियाणे, खते आदी शेतीशी संबंधित उत्पादने खरेदी करू शकतात. याशिवाय शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी दर १५ दिवसांनी मोहीम राबविण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री किसान समृद्धि केंद्राचे फायदे
कृषी क्षेत्राशी निगडित विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार
शेतीविषयक माहिती, खते, बियाणे, अवजारे आदी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार
माती, बियाणे व खते यांची चाचणी ची सुविधा उपलब्ध होणार
येत्या वर्षभरात तीन लाखांहून अधिक खतांच्या किरकोळ विक्री दुकानांचे रूपांतर पीएम किसान समृद्धी केंद्रात होणार आहे

तुम्हीही उघडू शकता केंद्र
पीएम किसान समृद्धी केंद्र उघडून देशातील कोणतीही व्यक्ती चांगला रोजगार मिळवू शकते. याच्या मदतीने तो दरमहा सुमारे १० ते १५ हजार रुपये सहज कमावू शकतो. ते उघडण्यासाठी फार काही करण्याची ही गरज नाही. जर तुम्हाला पीएम किसान समृद्धी केंद्र उघडण्यास स्वारस्य असेल तर आपण आपल्या जवळच्या कृषी विभाग किंवा उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधू शकता. अर्हता आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती याची माहिती खाली दिली आहे.

प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रासाठी पात्रता
तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे आणि तुमचे स्वत:चे किंवा भाड्याचे दुकानही असावे. याशिवाय संगणकाचे थोडेसे ज्ञानही असायला हवे.

पीएम किसान समृद्धी केंद्रासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक खाते पासबुक
मोबाइल नंबर
पासपोर्ट साइज फोटो
उत्पन्न प्रमाणपत्र
रहिवासी प्रमाण पत्र
जाति प्रमाण पत्र

ताज्या बातम्या

सरकारी योजना