आर्थिकवेब डिझायनरची नोकरी सोडून युनिक पद्धतीने सुरु केली शेती, वर्षाला कमवतोय 12...

वेब डिझायनरची नोकरी सोडून युनिक पद्धतीने सुरु केली शेती, वर्षाला कमवतोय 12 लाख

spot_img
spot_img

रोजगाराच्या निमित्ताने गाव सोडून मोठ्या शहरात जाणारे लोक तुम्ही पाहिले असतील. परंतु असे काही लोक आहेत की ते नोकरी सोडून गावाकडे येऊन शेतीतून भरभक्कम पैसे कमावतात. चित्तरंजन सिंग यापैकीच एक. कैमूरमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. त्यांनी वेब डिझायनरची मोठ्या रकमेची नोकरी सोडून दुग्धव्यवसाय, मत्स्य पालन आणि शेती सुरू केली. त्यातून ते लाखोंचे उत्पन्न घेत आहेत.

गावकऱ्यांनी सुरवातीला नाकारले
एका रिपोर्टनुसार, चित्तरंजन सिंग यांनी वाराणसीतील एका खासगी संस्थेतून वेब डिझाइनचा डिप्लोमा कोर्स केला आहे. त्यानंतर दिल्लीत एका खासगी कंपनीत वेब डिझायनर म्हणून काम केले. 2009 ते 2011 पर्यंत दिल्लीत काम केले. परंतु त्यांचे मन त्यात रमले नाही. ते नोकरी सोडून गावात परत आले. सुरवातीला घरच्यांनी तसेच गावकऱ्यांनी त्यानं वेड्यात काढलं. परंतु त्यांनी हार न मानता शेतीसोबतच मत्स्यपालन, गाई पालन सुरू केले.

शेतीसोबत गाई पालन आणि मत्स्यपालन
एका मीडियाशी बोलताना चित्तरंजन सिंग यांनी सांगितले की, ते दोन एकरात मत्स्यपालन करत आहेत. एका हंगामात ते 140 क्विंटलहून अधिक मासळीचे उत्पादन घेतात. सर्व खर्च जाता त्यांना 5 लाखांचा नफा होतो. त्यांच्याकडे 16 गायी आणि 10 म्हशी आहेत. त्यातून ते दररोज 200 लिटर दूध मिळवतात.

वर्षाला 12-13 लाखांचा इन्कम
चित्तरंजन सिंग सांगतात की, त्यांना केवळ गायींच्या संगोपनातून वार्षिक 4 लाख 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. शेतीतून 2 लाखांची कमाई होते. यासोबतच मत्स्यपालनातून 5 लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. म्हणजेच ते वर्षाला 12 ते 13 लाख रुपये कमवत आहेत.

ताज्या बातम्या

सरकारी योजना