कृषीलय भारी ! 8 वी पास शेतकऱ्याने लावला लाल मुळ्याचा शोध, मिळतोय...

लय भारी ! 8 वी पास शेतकऱ्याने लावला लाल मुळ्याचा शोध, मिळतोय 100 रुपये किलो भाव

spot_img
spot_img

शेतीमध्ये अनेक शेतकरी आता नवनवीन तंत्रे वापरत आहेत. तंत्रज्ञाचा वापर आता शेतीत देखील होऊ लागला आहे. त्यामुळे आता अगदीच अचंबित करणारे प्रयोग शेतात होऊ लागले आहेत. अशाच एका तंत्राच्या साहाय्याने 8 वी पास असणाऱ्या मदनलाल या शेतकऱ्याने लाल मुळ्याची लागवड केली अन त्यातून जबरदस्त नफा मिळवला आहे.

लाल मुळा लागवडीची कल्पना कशी सुचली
बहुतेक लोक पांढर्‍या मुळ्याची लागवड करत असतात. त्यामुळे लाल मुळ्याची लागवड हा विषयच अनेकांना आश्चर्यचकित करू शकतो. याबाबत मदनलाल सांगतात की, त्यांना कृषी विज्ञानाशी संबंधित माहितीशी जोडलेले राहायला आवडते. कृषी विद्यापीठाच्या उपक्रमात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. कृषी शास्त्रज्ञांनाही ते भेटतात. याशिवाय केंद्रीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रांशी संपर्क ठेवतात.या माध्यमातूनच त्यांना लाल मुळा पिकवण्याची कल्पना सुचली.

‘अशा’ पद्धतीने तयार केली रोपे
लाल मुळ्याच्या लागवडीसाठी त्यांनी बरीच पुस्तके वाचली आणि कृषी संशोधकांना भेटले. यानंतर, दोन कलमे मिसळून एक रोप तयार केले. त्याचे जीर्ण पद्धतीने बी तयार केले. सतत थंडीच्या दिवसात चार वर्षे पेरणी केली. त्यात दरवर्षी सुधारणा होत गेली. अन आता परिपूर्ण असे रोप तयार झाले.

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध
या नवीन प्रकारच्या मुळ्यामधे चवीत कोणतीही कमतरता नाही. या मुळ्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्याचे बियाणेही तयार केले जात आहे, जेणेकरून त्याचे उत्पादन वाढवता येईल. बाजारात सामान्य मुळा 20 ते 30 रुपये किलोने विकला जातो. तर या लाल मुळ्याला 100 रुपये किलो भाव मिळत आहे. काही मोठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट त्यांच्याकडून हा मुळा घेत आहेत.

शेतकरी मदनलाल यांचाही गौरव करण्यात आला आहे
मदनलाल शेतीत नवनवीन शोध घेत असतात. लाल मुळा करण्यापूर्वी त्यांनी दुर्गा ही लाल गाजराची प्रगत जाती विकसित केली आहे. त्याचे बियाणे ते देशभर पुरवतात. 2017 मध्ये त्यांना शासनाकडून सन्मानित करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

सरकारी योजना