पारंपारिक पिकांच्या लागवडीत सातत्याने होणारे नुकसान लक्षात घेता शेतकरी आता नवीन आणि फायदेशीर पिकांकडे वळत आहेत. औषधी पिकांच्या लागवडीकडेही शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. गुलखैरा लागवडीतून देशातील शेतकरी मोठ्या संख्येने नफा कमावत आहेत. गुलखैरा वनस्पतीची फुले, पाने, देठ आणि बिया हे सर्व बाजारात चांगल्या दरात विकले जातात.
औषधी वनस्पतींचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये अश्वगंधा, शतावरी, ब्राम्ही, तुळस इत्यादी होय. परंतु यामध्ये गुल खैरा एक औषधी वनस्पती आहे. या फुलाची देठ, पाने आणि बियांना बाजारात खूप मागणी आहे चांगल्या भावात देखील त्या विकल्या जातात. त्यामुळे हे फुल शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.
ही फुले चमकदार रंगासाठी प्रसिद्ध आहेत.
गुलखैराचे फूल दिसायला अतिशय सुंदर असते. एका झाडावर डझनभर फुले येतात. त्याची फुले चमकदार रंग आणि आकर्षकतेमुळे खूप प्रसिद्ध आहेत.
फुले आणि देठ औषधांमध्ये वापरले जातात
गुलखैराची फुले, पाने आणि देठ पुरुषी शक्ती प्रदान करणार्या औषधांमध्ये वापरले जातात. याशिवाय या फुलापासून बनवलेली औषधे ताप, खोकला आणि अनेक आजारांवर खूप फायदेशीर ठरतात. त्याची फुले बाजारात दहा हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलदराने विकली जातात. गुलखैराची फुले एकरी १५ क्विंटलपर्यंत वाढतात. यामुळे तुम्हाला दीड लाख रुपयांपर्यंतचा नफा सहज मिळू शकतो. त्याचबरोबर त्याचे बियाणे, पाने आणि देठ विकून अतिरिक्त नफाही मिळतो.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सारख्या देशांमध्ये पिकवलेल्या या वनस्पतीची लागवड आता भारतात केली जात आहे. भारतातील उत्तर प्रदेशात जस्तीत जास्त शेतकरी याची लागवड करू लागले आहेत आणि चांगला नफा मिळवत आहेत.