आर्थिकफेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात या भाजीपाल्याची करा लागवड, मिळेल भरघोस नफा

फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात या भाजीपाल्याची करा लागवड, मिळेल भरघोस नफा

spot_img
spot_img

फेब्रुवारी महिना संपून 18 दिवस उलटले आहेत. शेतीच्या दृष्टीने हा महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शेतकरी या महिन्यात अनेक पिकांची लागवड करून चांगला नफा कमावू शकतात. फ्लॉवर, हिरवा वाटाणा, शिमला मिरची, कांदा, ही देखील अशीच काही पिके आहेत. या पिकांची लागवड करून शेतकरी अल्पावधीत चांगला नफा कमावू शकतो.

फुलकोबी
त्याची लागवड नर्सरी पद्धतीने केली जाते. एक हेक्टरसाठी 200 ते 300 ग्रॅम बियाणे लागते. रोपवाटिकेत बियाणे लावल्यानंतर रोपे 4-5 आठवड्यांची झाल्यावर शेतात लावावीत. रंगीबेरंगी फुलकोबी लागवडीसाठी सप्टेंबर ते ऑक्टोबर हा महिना उत्तम मानला जातो.

पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी योग्य प्रमाणात खत घालणे आवश्यक आहे. गायीच्या शेणाचे सडलेले खत जमिनीत मिसळता येते. यामुळे पिकाच्या विकासासाठी खूप मदत होईल. याशिवाय मातीचीही तपासणी करता येते. चाचणी करून जमिनीत कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आढळते त्यानंतर त्यानुसार तुम्ही चांगल्या पद्धतीने लागवड करण्याचे नियोजन करू शकता रोपे लावल्यानंतर 100-110 दिवसांनी पीक काढणीसाठी तयार होते. एक हेक्टरमधून सरासरी 200-300 क्विंटल कोबीचे पीक मिळते. रंगीबेरंगी फुलकोबीला बाजारात चांगला भाव मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो.

शिमला मिरची
शिमला मिरचीचे बियाणे महाग असल्याने त्याची रोपे प्रो-ट्रेसमध्ये तयार करावीत. एक हेक्टर क्षेत्रात २०० ते २५० ग्रॅम संकरित व ७५० ते ८०० ग्रॅम सर्वसाधारण जातीचे बियाणे लागते. शिमला मिरचीची रोपे ३० ते ३५ दिवसांत लागवडीयोग्य होतात. लागवडीच्या वेळी रोपांची लांबी सुमारे १६ ते २० सेंमी व ४-६ पाने त्याला असावीत. लागवडीपूर्वी रोपे ०.२ टक्के कार्बेन्डाझिममध्ये बुडवून आधी तयार केलेल्या छिद्रात लावावीत.

रोपांची लागवड चांगल्या प्रकारे तयार केलेल्या बेडमध्ये करावी, बेडची रुंदी सहसा ९० सेंमी असावी. ठिबक लाइन टाकल्यानंतर ४५ सेंमी अंतरावर रोपांची लागवड करावी. शिमला मिरची लागवडीसाठी जमिनीचे पीएच मूल्य ६ असावे. तर शिमला मिरची वनस्पती ४० अंशांपर्यंत तापमान सहन करू शकते.

शिमला मिरची लागवडीनंतर ७५ दिवसांनी उत्पादन घेण्यास सुरवात होते. त्याच्या उत्पादनाबद्दल बोलायचे झाले तर १ हेक्टरमध्ये शिमला मिरची पिकाचे उत्पादन ३०० क्विंटल पर्यंत होते.

ताज्या बातम्या

सरकारी योजना