आर्थिकRed Chili Farming: महाराष्ट्रातील हे गाव बनतंय लाल मिरचीचे केंद्र, शेतकरी कमावतायेत...

Red Chili Farming: महाराष्ट्रातील हे गाव बनतंय लाल मिरचीचे केंद्र, शेतकरी कमावतायेत लाखोंचा नफा

spot_img
spot_img

Red Chili Farming : भारतीय पाककृती लाल मिरचीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. लाल मिरचीचा वापर स्वयंपाकात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अनेक राज्यांमध्ये याची लागवडही मोठ्या प्रमाणात केली जाते. आता नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बरबडा गाव देशी लाल मिरचीमुळे चर्चेत आहे. हे गाव लाल मिरची उत्पादनाचे केंद्र बनले आहे.

50 वर्षांपासून शेतकरी कमावतायेत नफा
या गावातील शेतकरी गेल्या 50 वर्षांपासून या देशी पिकातून प्रचंड नफा कमावत आहेत. सध्या बरबड़ा गावातील शेतकरी एक हजार एकरावर देगलोरी जातीच्या मिरचीची लागवड करीत आहेत. त्यांना यातून प्रचंड उत्पन्न मिळत आहे. सध्या या गावात पुणे, मुंबई, गुजरात, राजस्थान येथील व्यापारी मिरची खरेदीसाठी येतात.

बाजारात जोरदार मागणी
देगलूरी देशी मिरची खूप मसालेदार असते. व्यापाऱ्यांमध्ये या मिरचीला मोठी मागणी आहे. येथील शेतकरी पारंपरिक पद्धतीने या मिरचीचे पीक घेतात. या बियाण्यांपासून ते नवीन पिके घेतात. सध्या या मिरचीला प्रतिक्विंटल 25000 रुपये दर असल्याचे सांगितले जात आहे.

नफा चांगला मिळतोय
या लाल मिरचीचे बियाणे आमच्या गावातील असल्याचे येथील महिला मिरची उत्पादक अंजनबाई भुसाळद यांनी सांगितले. एका एकरात खत, लागवड ते काढणीपर्यंत ५० हजार रुपयांपर्यंतखर्च येतो. चांगले उत्पादन झाल्यास या पिकामधून २ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. लाल मिरचीची लागवड वर्षातून तीन वेळा करता येते.

ताज्या बातम्या

सरकारी योजना