आपला देश कृषी प्रधान देश आहे. परंतु असे असले तरी हवामानाच्या लहरीपणापासून वाचण्यासाठी तसेच आपली पिके बाजारात नेण्यासाठी शेतकऱ्यांना अजूनही पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यांना मदत करण्यासाठी सरकारने पीएम किसान एफपीओ योजना आणली आहे.
या योजनेअंतर्गत, 11 शेतकऱ्यांचा समूह अर्थात शेतकरी उत्पादक संघटना (FPO/FPC) असेल तर यांना शेतीशी संबंधित सर्व व्यवसाय सेटअपसाठी 15 लाख रुपयांची मदत दिली जाते.
शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे हा उद्देश
पीएम किसान एफपीओ योजनेचा उद्देश शेतकर्यांना स्वावलंबी बनवून आर्थिक संकटातून दिलासा देणे हा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी (FPO) स्थापन करावी लागेल, ज्यामध्ये किमान 11 शेतकरी असावेत. FPO ही शेतकरी आणि उत्पादकांची एकात्मिक संघटना आहे जी शेतकऱ्यांसाठी काम करते.
अर्ज कसा करावा?
तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर यासाठी अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या. तुम्हाला भारत सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटला https://www.enam.gov.in भेट द्यावी लागेल. त्यानंतर FPO ऑप्शन पेज उघडेल. जिथे क्लिक केल्यावर नोंदणी किंवा लॉगिनसह नवीन पेज उघडेल. येथे सर्व माहिती भरून तुम्ही सहजपणे या योजनेचा लाभ घेऊ शकता.