सरकारी योजनाPradhan Mantri Matsya Sampada Yojana : मत्स्यपालन करण्यासाठी मिळेल अनुदान , जाणून...

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana : मत्स्यपालन करण्यासाठी मिळेल अनुदान , जाणून घ्या केंद्र सरकारची ‘ही’ योजना

spot_img
spot_img

Pradhan Mantri Matsya Sampada Yojana : आजकाल व्यवसायाच्या अनेक संधी अन नवनवीन मार्ग उपलब्ध झाले आहेत. आजचा तरुण मत्स्यपालनाकडे वळू लागला आहे. यातून देखील खूप उत्पन्न मिळू शकते. विशेष म्हणजे याला चालना देण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आर्थिक मदत करत आहेत.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (Pradhan Mantri Matsya Sampada Yojana) तयार केली आहे. यामध्ये जर मत्स्यव्यवसाय करायचा असेल तर आर्थिक मदत मिळते. चला जाणून घेऊयात याविषयी सविस्तर..

मत्स्यपालनासाठी 50% पर्यंत अनुदान
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत, राज्य सरकार शेतकरी आणि गरीब ग्रामीण पशुपालकांना मत्स्यपालनासाठी 50 टक्के पर्यंत अनुदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. याशिवाय त्यांना आर्थिक मदतीसोबत नवीन तंत्रज्ञानाशी जोडण्याचेही सरकारचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून उत्पन्न दुप्पट करून नफा मिळवता येईल.

राज्यानुसार वेगेवेगळी धोरणे
प्रत्येक राज्यात त्या त्या सरकार नुसार याचा अवलंबकेला जातो. काही राज्ये याबाबतीत अत्यंत अग्रेसर आहेत. तर काही राज्य सरकार याबाबतीत अजून थोडे मागे आहेत. परंतु मत्स्य व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या मदतीने एक मोठा पर्याय मिळू शकतो. याद्वारे आपण आर्थिक प्रगती देखील याद्वारे साधू शकतो.

ताज्या बातम्या

सरकारी योजना