सध्या महाराष्ट्रात पशुपालन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात गायी पाळणाऱ्यांच्या संख्या वाढत आहेत. गायीच्या अनेक जाती आहेत. यामध्ये लाल कंधारी ही जात सध्या लोकप्रिय होताना दिसत आहे.
लाल कंधारी गाय महाराष्ट्रातील कंधार येथे आढळते. दुग्धोत्पादनाची क्षमता या गायींमध्ये जास्त असते असे म्हटले जाते. या जातीच्या गायीचे पालन इतर राज्यातही केले जात आहे. चौथ्या शतकात कंधारच्या राजांनी ही गाईची जात विकसित केली होती असे मानले जाते. त्याचे पालन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर मानले जाते.
आपल्या देशाचा ग्रामीण भाग शेतीवर तसेच पशुपालनावर अवलंबून आहे आणि तो उत्पन्नाचा एक मोठा स्रोतही बनत आहे. वाढत्या वैज्ञानिक तंत्रज्ञानामुळे आता पशुपालनाकडे लोकांचा कल वाढत आहे.
जर शेतकऱ्यांना दीर्घकाळ दूध उत्पादन करायचे असेल, तर त्यांनी लाल कंधारी गायी वापरण्याचा सल्ला अनेक तज्ज्ञ देतात. महाराष्ट्रातील कंधार तालुक्यात आढळणारी ही लाल कंधारी गाय तिच्या खास दुधासाठी ओळखली जाते. ही गाय गडद तपकिरी आणि गडद लाल रंगाची असून तिला लांब कान आहेत.
सध्या बाजारात त्यांची किंमत 40 ते 50 हजार रुपये आहे. या गाईच्या संगोपनात जास्त मेहनत करावी लागत नाही, परंतु त्यांना आवश्यकतेनुसार आहार देणे अत्यंत आवश्यक आहे. या गायींना जास्त डोस दिल्यास अपचनाचा त्रास होऊ शकतो. या गायींना शेंगायुक्त चाऱ्यासह मिश्र चारा द्यावा.
ही गाय वर्षात किती दिवस दूध देऊ शकते याबाबत अनेकांना प्रश्न पडला असले. तर एका मीडियाच्या रिपोर्टनुसार ही गायी २७५ दिवस दूध देऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांची दररोज चार लिटर दूध देण्याची क्षमता आहे. बाजारात एक लिटर दूध 60 रुपयांना विकले जाते.