Friday, May 10, 2024
बातम्याचिकन खाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! कोंबड्यांना दिली जाणारी मानवासाठी किती धोकादायक जाणून...

चिकन खाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! कोंबड्यांना दिली जाणारी मानवासाठी किती धोकादायक जाणून घ्या

आज चिकन खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. परंतु आपण जे चिकन खातो त्या ब्रॉयलर कोंबड्याना जी औषधे दिली जातात ती मानवासाठी धोकादायक ठरत आहेत अशा सध्या चर्चा सुरु आहेत.

सध्या अनेक ठिकाणी सर्रास कोंबड्यांची वजन वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक चांगली अंडी मिळावीत यासाठी विविध औषधे दिली जात आहेत. अंडी आणि चिकन खाणाऱ्या माणसांसाठी ही औषधे धोक्याची ठरत आहेत अशा बातम्या सोशल मीडियावर वेळोवेळी समोर येत असतात. पण, अशा बातम्यांमागील वास्तव काही वेगळेच आहे. एका प्रसिद्ध मीडियाने सेंट्रल एव्हियन रिसर्च इन्स्टिट्यूट, बरेलीचे संचालक आणि पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी काही बाबतीत खुलासा केला.

तज्ज्ञांनी केला हा खुलासा
सेंट्रल एव्हियन रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक अशोक कुमार तिवारी यांनी प्रसिद्ध मीडियाला असे सांगितले आहे की, कोंबड्यांना अँटिबायोटिक्स खाल्ल्याने त्यांचे वजन वाढते किंवा जास्त अंडी घालतात हे आजपर्यंत कोणत्याही संशोधन आणि तपासात सिद्ध झालेले नाही. कोंबड्या आजारी पडू नयेत म्हणून हे औषध बनवले जाते.

पोल्ट्री फेड फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रणपाल दांडा यांनी सांगितले की, सोशल मीडियावर काही दिशाभूल करणाऱ्या बातम्या आहेत जसे की ब्रॉयलर कोंबडीचे वजन औषधे देऊन वाढवता येते, अंडी देणाऱ्या कोंबडीपासून अधिकाधिक चांगली अंडी घेता येतात. परंतु हे खोटे आहे.

अंडी आणि कोंबडी खाणाऱ्यांवर या प्रकारच्या औषधांचा कसला परिणाम होतो याला सध्या कोणताही आधार नाही. असे ते म्हणाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, शेतीवाडी च्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

दिवसभरातील टॉप न्यूज़