आर्थिकSugarcane : 1 टन ऊसामधून मिळवा 25 हजारांचे उत्पन्न, आला हा...

Sugarcane : 1 टन ऊसामधून मिळवा 25 हजारांचे उत्पन्न, आला हा नवा पर्याय

spot_img
spot_img

Sugarcane : सध्या कमी दरामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. उसासाठी दुसरा कोणता पर्याय असू शकतो, याची चर्चा सध्या शेतकरी करत आहेत. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. कमी शेती क्षेत्र आणि इतर व्यवसाय किंवा नोकऱ्या करणार्यांना ऊस शेती जवळची वाटत आहे. उसाला इतर पिकांप्रमाणे जास्त वेळ लागत नसल्याने अनेक शेतकरी आपले इतर व्यवसाय, नोकरी करत शेती सांभाळताना दिसतात.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने ऊस लागवड फायदेशीर राहिलेली नाही. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा प्रक्रिया उद्योगाची माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला 1 टन उसापासून 25 हजारांची कमाई होऊ शकते.

शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळाल्यास ते बाजारात विकणे पसंत करतात. मात्र, काही वेळा या शेतकऱ्यांना म्हणावा तसा भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना आपला माल कमी दराने विकावा लागत आहे. मात्र शेतकऱ्यांकडे चांगला पर्याय आहे. फळांपासून ज्यूस, जॅम, जेली, लोणचे असे अनेक पदार्थ बाजारात विकले जातात. त्याचप्रमाणे आता केवळ उसाची साखर न बनवता जॅम बनवून त्याची विक्री करता येणार आहे. आज आपण ‘केन जॅम’च्या निर्मितीबद्दल जाणून घेणार आहोत.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोइमतूर (तामिळनाडू) ऊस उत्पादन केंद्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश जी. एस. यांनी उसाच्या रसाचे मूल्यवर्धन करून प्रथमच ‘केन जॅम’ची निर्मिती केली आहे. गेल्या वर्षी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ९३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विकसित उत्पादनाचे अनावरण केले होते. या उत्पादनात उसाचा रस पूर्णपणे वापरून साखर न मिसळता उत्पादन विकसित करण्यात आले आहे.

एक टन उसापासून २५ हजार रुपये उत्पन्न
तंत्रज्ञानाचे अभ्यासक डॉ. सुरेश म्हणाले की, उसापासून बनविलेल्या जॅममध्ये जीवनसत्त्वे व्यतिरिक्त पोटॅशियम, स्यूडोएम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ही खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. ऊस उत्पादकांना एक टन उसातून सुमारे २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असा दावा त्यांनी केला.

या जॅमची वैशिष्ट्ये काय आहेत?
– उसाच्या रसाचे पोषणमूल्य व चव जपली जाते.
– फळांच्या विविध चवींचे घटक मिसळता येते.
– हे उत्पादन विकसित करताना अननस, चेरी, चॉकलेट, बटाटा-लिंबू, आले आणि दालचिनी ची चव तयार करण्यात आली आहे.

– जॅम ब्रेड, चपाती, इडली, डोसा आणि केक सारख्या पदार्थांसोबत याचा वापर केला जाऊ शकतो.
– जाममध्ये जीवनसत्त्वांशिवाय पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ही खनिजे जॅममध्ये मुबलक प्रमाणात मिळतात.
– या उत्पादनात उसाचा रस पूर्णपणे वापरून साखर न मिसळता हे उत्पादन तयार करण्यात आले आहे.

व्यावसायिक उत्पादनासाठी कोठे संपर्क साधाल?
या व्यावसायिक उत्पादनासाठी महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील दोन कंपन्यांना तंत्रज्ञान परवाना हस्तांतरित करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान व्यावसायिक उत्पादनासाठी अन्न प्रक्रिया उद्योगांकडे हस्तांतरित केले जात आहे. इच्छुकांनी संस्थेच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोइमतूर या ऊस उत्पादक संस्थेशी संपर्क साधावा.

ताज्या बातम्या

सरकारी योजना