आर्थिकStevia Farming : या झाडांच्या पानांना औषधासाठी मागणी, एकदा लावाल तर 5...

Stevia Farming : या झाडांच्या पानांना औषधासाठी मागणी, एकदा लावाल तर 5 वर्षे मिळेल लाखोंचे उत्पन्न

spot_img
spot_img

पारंपारिक पिकांच्या लागवडीतील नफा सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडेसे वेगळ्या दृष्टीने विचार करत पिके घ्यावीत. सरकार देखील शेतकऱ्यांना नवीन पिके घेण्याचा सल्ला देत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. स्टीव्हिया देखील या औषधी वनस्पतींपैकी एक आहे. याची लागवड केल्यास भरघोस उत्पन्न तुम्ही काढू शकता. चला जाणून घेऊयात याविषयी –

स्टीव्हियाच्या पानांमध्ये बरेच पोषक तत्व असतात
स्टीव्हियाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. तसेच कॅल्शियम, झिंक, लोह, फॉस्फरस, तांबे, मॅंगनीज यांसारखे घटकही आढळतात, जे अनेक आजारांवर फायदेशीर मानले जातात.

५ वर्षे नफा कमवा
कटिंग फांद्या किंवा पेरणी करण्याच्या पद्धतीद्वारे स्टीव्हियाची लागवड करता येते. स्टीव्हियाची लागवड वर्षातून दोनदा करता येते. त्याची लागवड सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत केली जाते. सामान्य तापमानात त्याची वनस्पती बरीच वाढते. त्याची लागवड नर्सरी पद्धतीने केली जाते. आधी बियापासून रोपे तयार केली जातात, नंतर शेतात रोपे लावली जातात. उन्हाळ्याच्या महिन्यात स्टीविया पिकाला दर आठवड्याला सिंचनाची गरज भासते. तर थंडीच्या हंगामात हे अंतर १० दिवसांचे होते. एकदा हे पीक घेतले की ते सलग ५ वर्षे नफा देऊ शकते.

१ लाख रुपये खर्चकरून ८ लाख रुपयांपर्यंत नफा
स्टीव्हिया एक औषधी वनस्पती आहे, जी सामान्यत: बर्याच रोगांसाठी वापरली जाते. एका एकरात सुमारे ४० हजार स्टीव्हियाची रोपे लावता येतात. यासाठी एक लाखापर्यंत खर्च येतो. एका एकरात स्टीव्हियाची ४० हजार रोपे लावल्यास २५ ते ३० क्विंटल कोरड्या पानांचे उत्पादन होईल. बाजारात स्टीव्हियाचा दर २५० ते ५०० रुपये किलो पर्यंत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला एका एकरात ८ ते १० लाख रुपयांपर्यंत नफा नक्कीच मिळू शकतो.

ताज्या बातम्या

सरकारी योजना