कृषीमहाराष्ट्रात अंड्यांचा तुटवडा, व्यवसाय करण्यासाठी सरकार देतेय पैसे; पहा सविस्तर

महाराष्ट्रात अंड्यांचा तुटवडा, व्यवसाय करण्यासाठी सरकार देतेय पैसे; पहा सविस्तर

अंडी हा अनेकांच्या आहारातील प्रमुख घटक झाला आहे. दरम्यान महाराष्ट्रात अंड्यांची कमतरता जाणवत आहे. एका रिपोर्टसच्या आकडेवारीनुसार राज्यात एक कोटी अंड्यांचा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान आता हे उत्पादन वाढवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आराखडा तयार केला असून एक मोठे प्लॅनींग केले आहे.

spot_img

एका मोठ्या मीडियाच्या रिपोर्टनुसार वरिष्ठ अंधकाऱ्याने सांगितले की, पशुसंवर्धन विभाग प्रत्येक जिल्ह्याला 21,000 रुपयांच्या अनुदानित दराने 50 पांढऱ्या लेगहॉर्न कोंबड्या आणि 1,000 पिंजरे उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

सध्या ‘या’ राज्यातून अंडी खरेदी केली जातात महाराष्ट्रात दररोज 2.25 कोटींहून अधिक अंडी विकली जातात. पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.धनंजय परकाळे म्हणाले की, राज्यात दररोज एक ते 1.25 कोटी अंडी उत्पादन करण्याची क्षमता आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी विभाग नियोजन करत आहे. टंचाईवर मात करण्यासाठी सध्या कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू येथून अंडी खरेदी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कमतरतेमुळे अंड्याच्या किमतीत वाढ अंड्यांच्या कमतरतेमुळे किमतीमध्ये वाढ झाली आहे. काही ठिकाणी 100 अंड्यांची किंमत 575 रुपये आहे. मागील काही काळापासून अनेक राज्यांमध्ये अंडी उत्पादनावर खूप लक्ष दिले जात आहे. शेतकरी आणि पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार विविध योजनांवर काम करत आहे. शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसाय स्वीकारण्यासाठी शासन अनुदान देते.

ताज्या बातम्या

सरकारी योजना