एक शेतकरी टरबूज आणि खरबूजाची लागवड करून लाखोंचे उत्पन्न घेत आहे. हा शेतकरी बिहारमधील कैमूर येथील असून मुन्ना सिंग असे त्यांचे नाव आहे.
एका रिपोर्टनुसार त्यांनी या पिकांच्या माध्यमातून 60 लाखांपर्यंतचे उत्पन्न घेतले आहे.
एक एकर शेतीत 1 लाख रुपये खर्च
मुन्ना सिंग सांगतात की, तैवानी टरबूज आणि खरबूज पिकवणे खूप फायदेशीर आहे. त्याची एक एकर लागवड करण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. या खर्चांतर जेव्हा याचे उत्पन्न निघते ते साधारण तीन ते चार लाख रुपयांपर्यंत नफा देऊन जाते. बाजारात जेव्हा ही फळे येतात तेव्हा या फळांची किंमत 30 ते 70 रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे यातून खूप मोठा नफा मिळतो. याशिवाय सुमारे 40 जणांना त्यांनी या शेतीतून रोजगार दिला आहे. यातील 5 ते 6 जण त्यांच्याकडे वर्षभर ठराविक पगारावर काम करतात.
तैवानी टरबूज-खरबूज आरोग्यासाठी फायदेशीर
तैवानी टरबूज-खरबूजमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. ते चवीला खूप गोड असते. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पचन सुधारते, रक्तदाब कमी होतो. तसेच त्वचेचे आरोग्य सुधारते. यासोबतच इतरही अनेक फायदे आहेत.