आर्थिकKisan Urja Mitra Yojana: ह्या राज्यातील शेतकऱ्यांना वीज बिले येतात शून्य, मिळते...

Kisan Urja Mitra Yojana: ह्या राज्यातील शेतकऱ्यांना वीज बिले येतात शून्य, मिळते इतके अनुदान

महागड्या विजेमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात चांगल्या प्रकारे सिंचन करता येत नाही. यामुळे शेतीचा खर्च कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राजस्थान सरकारने किसान मित्र ऊर्जा योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरमहा एक हजार रुपयांची मदत मिळते.

spot_img
spot_img

Kisan Urja Mitra Yojana: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि शेतीतील त्यांचा खर्च कमी व्हावा यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील शेतकऱ्यांना वीज बिलावर 1000 रुपयांचे अनुदान दिले जात आहे. हे अनुदान फक्त अशा शेतकऱ्यांना दिले जाते, ज्यांच्याकडे पूर्वी कोणत्याही प्रकारचे वीज बिल थकीत नाही.

कृषी खर्च कमी करण्यासाठी हि योजना सुरू करण्यात आली
महागड्या विजेमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात चांगल्या प्रकारे सिंचन करता येत नव्हते. यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढण्याबरोबरच पिकांच्या उत्पादनावरही परिणाम होत होता. या कारणास्तव राजस्थान सरकारने शेतीचा खर्च कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी किसान मित्र ऊर्जा योजना सुरू केली आहे.

शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटला
किसान मित्र ऊर्जा योजना आल्याने शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या बऱ्याच अंशी कमी झाली आहे. योग्य वेळी वीज मिळाल्याने त्यांच्या पिकांच्या सिंचनाच्या गरजा पूर्ण होत आहेत. तसेच विजेवरील अनुदानामुळे हा बोजा त्यांच्या खिश्यावर जास्त पडत नाहीये. राजस्थान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 7 लाख 85 हजार शेतकऱ्यांचे वीज बिल ही शून्यावर आणण्यात आले आहे.

वीज, बँक खाते आणि आधार लिंक करा
राजस्थान किसान मित्र ऊर्जा योजनेअंतर्गत जर एखाद्या शेतकऱ्याचे वीज बिल 1000 रुपयांपेक्षा कमी असेल तर त्याचे प्रत्यक्ष बिल आणि अनुदानाची रक्कम यातील तफावत त्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल. हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्याला आपला वीज खाते क्रमांक आणि बँक खाते क्रमांक आधारशी लिंक करावा लागणार आहे.

योजनेची पात्रता
> अनुदान फक्त सामान्य प्रवर्ग ग्रामीण मीटर आणि फ्लॅट रेट श्रेणी कृषी मीटरवर देण्यात येणार आहे.
>शेतकरी हा मूळचा राजस्थानचा असावा.
>शेतकऱ्याचा आधार क्रमांक आणि बँक क्रमांक लिंक करावा.

शेतकऱ्यांना येथे अर्ज करावा लागेल.
मुख्यमंत्री किसान मित्र ऊर्जा योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी अर्जदाराला प्रथम त्याच्या जवळच्या वीज विभागात जावे लागेल. अर्जासोबत त्यांचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, बँक खाते, फोटो आदी माहिती भरून वीज बिलाची पावती, आधार ची छायाप्रत जोडावी लागणार आहे.

ताज्या बातम्या

सरकारी योजना