बातम्यामहाराष्ट्रात थंडी पडलीच नाही ! आता तर सूर्य आग ओकणार, तापमान वाढण्याची...

महाराष्ट्रात थंडी पडलीच नाही ! आता तर सूर्य आग ओकणार, तापमान वाढण्याची शक्यता

spot_img
spot_img

गुलाबी थंडी पडते न पडते तोच हिवाळा कधी संपला हे अजूनही अनेकांना कळेना. चार महिन्यांत एक महिनाही थंडीचा अनुभव आलेला नाही. असे होते न होते तोच आता आग भडकू लागली आहे. हवेतील तापमान वाढत चालले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात उन्हाचा कडाका वाढणार आहे.

यंदा हवामान जरा बदललेले दिसते. हिवाळ्यातही म्हणावे अशी थंडी यंदा पडलीच नाही. दरम्यान आता हा उन्हाळा किती तीव्र असेल याची कल्पना केली जात आहे.

उन्हाळा सुरू होताच मार्च, एप्रिल, मे हा खरा उन्हाळा किती उष्ण असणार आहे, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यंदा कडक उन्हाळ्याची तयार करावी लागणार आहे. उन्हाळ्याची तीव्रता मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. ग्लोबल वार्मिंगचा हा एक परिणाम आहे असे म्हटले जाते. जगभरातील वातावरणावर याचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसते.

ताज्या बातम्या

सरकारी योजना