वंदना सिंग या ड्रॅगन फ्रूट आणि स्ट्रॉबेरीची लागवड करून भरपूर नफा कमावत आहेत. वंदना सिंहच्या म्हणण्यानुसार, तिने गुगल आणि यूट्यूबच्या मदतीने शेती शिकली आहे. आणि आता यातून जवळपास कोट्यवधि रुपये कमवत आहे.
यावर्षी त्यांना 5 लाखांचा नफा झाला
वंदना सिंग यांनी अर्ध्या एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. यावर्षी त्यांना 5 लाखांचा नफा झाला आहे. याशिवाय स्ट्रॉबेरी शेती देखील त्यांनी केली आहे. नफ्याचा विचार केला तर ड्रॅगन फ्रूट आणि स्ट्रॉबेरीच्या लागवडीत पहिल्या-दुसऱ्या वर्षी कमी नफा मिळतो. त्यानंतर म्हणजेच तिसऱ्या वर्षी हा नफा अनेक पटींनी वाढतो असे वंदना सिंग यांनी सांगितले आहे. ड्रॅगन फ्रूटची फळे 400 रुपये किलो दराने विकली जातात.
त्यांना ‘या’ शेतीची कल्पना कशी आली?
वंदना सिंह यांना सदर कल्पना तुम्हाला कशी सुचली हे विचारले असता त्यांनी सांगितले की, त्यांना ही कल्पना यूट्यूबवरून सुचली. त्यांनी ड्रॅगन फ्रूटसह उर्वरित जमिनीवर स्ट्रॉबेरी आणि हळद यांची लागवड केली जाते, त्यातूनही भरपूर नफा मिळतो.
वंदना सिंग यांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मानितही करण्यात आले
वंदना सिंह यांना या कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले आहे. त्या सध्या आपल्या परिसरातील महिलांसाठी तसेच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत.