सरकारी योजनाट्रॅक्टर खरेदीवर मिळवा ५०% अनुदान, पहा शासनाची 'ही' योजना

ट्रॅक्टर खरेदीवर मिळवा ५०% अनुदान, पहा शासनाची ‘ही’ योजना

spot_img
spot_img

सध्या शेती क्षेत्र अत्यंत प्रगत होत चालले आहे. यात आता आधुनिकतेचा वापर होत आहे. विविध यंत्रसामुग्रीचा यात समावेश आहे. दरम्यान शेतीमध्ये आता ट्रॅक्टरला जास्त पसंती दिली जात आहे.

बहुतांश शेती अवजारे ट्रॅक्टरला जोडून चालवली जातात. शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर असेल तर शेतमालाच्या वाहतुकीबरोबरच वाहतुकीचे कामही सोपे होते. ट्रॅक्टरही महागड्या दराने विकले जातात, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे ते विकत घेण्यासाठी पैसे नसतात. याच साठी सरकारने एक योजना आणली आहे की ज्याद्वारे शेतकऱ्यांना सबसिडी दिली जात आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांद्वारे ट्रॅक्टर खरेदीवर कर्ज आणि अनुदानाचा लाभ दिला जातो. त्याचबरोबर राज्य सरकारही शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी मदत करत आहे. हरियाणा सरकार शेतकऱ्यांना 50% अनुदानावर ट्रॅक्टर उपलब्ध करून देत आहे.

ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान
हरियाणा कृषी विभाग पानिपतच्या शेतकऱ्यांना अनुदानावर ट्रॅक्टर देत आहे. कमाल अनुदान 3 लाख रुपये किंवा 50% टक्के निश्चित करण्यात आले आहे. अनुदानावर ट्रॅक्टर खरेदी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना 20 जानेवारीपर्यंत सोडत नोंदणी करावी लागेल. याप्रकरणी जिल्हा उपायुक्त ललित सिवाच यांनी सांगितले की, पडताळणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी सोडत नोंदणी शुल्क 10,000 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

कसा मिळेल लाभ ?
या योजनेबाबत, हरियाणाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहाय्यक अभियंता म्हणाले की, शेतकऱ्याची निवड झाल्यानंतर, मान्यताप्राप्त उत्पादक किंवा डीलरकडून त्याच्या पसंतीच्या मॉडेलचा ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर, उर्वरित खर्च त्याच्या खात्यात वर्ग केला जाईल.

31 जानेवारीपर्यंत अर्जाची मुदत
येथे ट्रॅक्टरवर 50टक्के अनुदानासाठी 16 जानेवारीपर्यंत शुल्क जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, हरियाणा सरकार शेतकऱ्यांना 55 प्रकारच्या कृषी यंत्रांवर अनुदान देत आहे. या योजनेचा लाभ फक्त अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांनाच दिला जात आहे.

Disclaimer: बातम्यांमध्ये दिलेली काही माहिती मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे.

ताज्या बातम्या

सरकारी योजना