Egg production in Maharashtra : अंडी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. कारण अनेक लोकांचे हे आवडते खाद्य आहे. अनेक लोक सकाळच्या नाष्ट्यालाच अंडी खात असतात.
स्वस्त अन मस्त असा काहींचा हा नाश्ता आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल अंडी उत्पादनाच्या बाबतीत आपला देश जगाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अंडी उत्पादनाच्या बाबतीत देशातील पाच राज्ये एका बाजूला आणि उर्वरित देश दुसऱ्या बाजूला आहेत. देशाच्या एकूण अंडी उत्पादनापैकी 65 टक्के उत्पादन फक्त पाच राज्ये करत आहेत. तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये प्रति व्यक्ती सर्वाधिक अंडी उपलब्ध आहेत.
5 राज्यांच्या अंडी उत्पादनाबद्दल जाणून घ्या
केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाच्या 2021 च्या अहवालानुसार, गेल्या वर्षी देशात सुमारे 12 हजार कोटी अंड्यांचे उत्पादन झाले होते. यापैकी 65 टक्के म्हणजे 7.8 हजार कोटी अंडी केवळ 5 राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये उत्पादित झाली. अहवालानुसार, आंध्र प्रदेशात 2.5 हजार कोटी म्हणजे 20.45 टक्के, तेलंगणात 15शे कोटी 12.98 टक्के आणि तामिळनाडूमध्ये 2 हजार कोटी 16.49 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 1050 कोटी 8.60 आणि कर्नाटकात 761 कोटी 6.24 टक्के अंडी उत्पादन झाले.
हरियाणा-महाराष्ट्रातही 700 कोटींहून अधिक अंडी उत्पादन
आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या राज्यांपाठोपाठ हरियाणा आणि महाराष्ट्र 5 टक्क्यांहून अधिक अंडी उत्पादन करणाऱ्या देशांत आहेत. पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाच्या खजिनदार सांगतात की, देशातील 28 कोटींहून अधिक कोंबड्या अंड्याची मागणी पूर्ण करतात. तथापि, 2025-26 पर्यंत अंडी देणाऱ्या कोंबड्यांची संख्या 32 वरून 33 कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.