सध्या पारंपारिक पिकांमधून शेतकऱ्यांना हवे तसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकरी विविध वाटा शोधत आहे. याचाच एक भाग म्हणजे शेतकरी सध्या नगदी पिकांकडे वळला आहे. सध्या शेतकऱ्यांमध्ये स्वीट कॉर्नची लागवड अधिक लोकप्रिय झाली आहे. असेच एक शेतकरी हरियाणातील प्रगतीशील शेतकरी राधेश्याम म्हणून आहेत. त्यांनी स्वीट कॉर्नच्या शेतीतून लाखोंचा नफा कमावला आहे
जमीन भाडेतत्त्वावर घेऊन केली स्वीटकॉर्न शेती
शेतकरी राधेश्याम यांनी सुरवातीला दोन एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली. त्यानंतर त्यांनी तेथे स्वीट कॉर्नची शेती सुरू केली. त्यांनी या पिकाचे उत्पन्न 6 महिन्यांच्या कालावधीत दोनदा घेतले आहे. त्यामुळे त्यांना लाखोंचा नफा झाला आहे. त्यांच्या मते स्वीट कॉर्नच्या लागवडीत कमी खर्चात जास्त नफा मिळतो.
खर्चापेक्षा 5 आणि 6 पट जास्त नफा
राधेश्याम सांगतात की स्वीट कॉर्नच्या लागवडीला इतर पिकांच्या तुलनेत कमी खर्च येतो. एका एकरात केवळ 25-30 हजार रुपये खर्च करावे लागतात. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मात्र 5 ते 6 पट अधिक मिळते.
आरोग्यासाठी फायदेशीर
स्वीट कॉर्न हे जगभर घेतले जाणारे पीक आहे. मका हे खरीप पीक म्हणूनही ओळखले जाते. अनेक भागात ते उन्हाळ्यातही घेतले जाते. त्याच्या फायदेशीर गुणधर्मांमुळे, ते जास्त प्रचिलित झाले आहे.