आर्थिकBusiness Idea : गावातही करता येईल हा बिझनेस,होईल हजारोंची कमाई

Business Idea : गावातही करता येईल हा बिझनेस,होईल हजारोंची कमाई

spot_img
spot_img

Business Idea : दररोजच्या कामाला, नोकरीला कंटाळले असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कमी गुंतवणुकीत एखादा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता. सुरुवातीला या कमी खर्चाच्या व्यवसायाच्या कामगिरीवर तुमचा विश्वास बसणार नाही, पण त्यातून मिळणारा नफा तुम्हाला आनंद देईल. चला जाणून घेऊयात –

मशरूम शेती : १० पट फायदा
मशरूम शेती हा फायदेशीर बिझनेस आहे. मशरूम शेतीच्या खर्चाच्या १० पट नफा कमावू शकतात. म्हणजेच १ लाख रुपये गुंतवून तुम्ही १० लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. गेल्या काही वर्षांत मशरूमची मागणीही वाढली आहे.

दीड महिन्यात मशरूम तयार होतात
आजकाल रेस्टॉरंटमध्ये सर्वात जास्त मागणी बटन मशरूमला आहे. ते तयार करण्यासाठी गहू किंवा तांदळाचा भुसा काही रसायनांमध्ये मिसळून कंपोस्ट खत तयार केले जाते. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी एक महिना लागतो. यानंतर एका पृष्ठभागावर ६-८ इंच जाडीचा थर टाकून मशरूमच्या बिया लावल्या जातात.

बियाणे कंपोस्ट खताने झाकले जाते. मशरूम ४०-५० दिवसांत तयार होतात. मशरूम लागवडीसाठी शेडची जागा लागते. मशरूमची लागवड १ लाख रुपयांपासून सुरू होते आणि तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. याची बाजारात २५० ते ३०० रुपये किलोदराने विक्री होत होती. मोठ्या हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्सना चांगल्या प्रतीचे मशरूम पुरवले तर ५०० रुपये किलोपर्यंत दर मिळू शकतो.

ताज्या बातम्या

सरकारी योजना