जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या तेराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता फेब्रुवारीच्या २२ दिवसांनंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांची रक्कम पोहोचलेली नाही. ही रक्कम फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी येथे संपर्क साधावा.
पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 13 व्या हप्त्यासंदर्भात शेतकरी [email protected] अधिकृत ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. आपण पीएम किसान योजना – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. येथे शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवता येतील.
लाभार्थी यादीतून मोठ्या प्रमाणात नावे वगळली जाऊ शकतात
जमिनीच्या नोंदींच्या पडताळणीला वेग आला आहे. पडताळणी प्रक्रियेदरम्यान मोठ्या संख्येने अपात्र व्यक्तींची नावे लाभार्थी यादीतून वगळली जाऊ शकतात, असे मानले जात आहे. बाराव्या हप्त्यात एकट्या उत्तर प्रदेशातून २१ लाखांहून अधिक लोकांची नावे काढून टाकण्यात आली. ओडिशा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही मोठ्या प्रमाणात नावे कापण्यात आली. बिहारमध्येही हजारो लोकांची नावे वगळण्यात आली. नेमका तोच धोका यंदाही आहे.
आगामी हप्ते मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी करावे ‘हे’ काम
जर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या आगामी हप्त्यांचा लाभ घ्यायचा असेल तर ई-केवायसीची प्रक्रिया नक्कीच पूर्ण करा. यासाठी तुम्हाला या योजनेच्या pmkisan.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटशिवाय सीएससी सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसी करून घेऊ शकता. तसे न करणारे शेतकरी तेराव्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात.