आर्थिकGuava Cultivation : पेरूच्या शेतीतून मिळावा लाखोंचे उत्पन्न, या पद्धतीने करा लागवड

Guava Cultivation : पेरूच्या शेतीतून मिळावा लाखोंचे उत्पन्न, या पद्धतीने करा लागवड

spot_img
spot_img

पेरू हे भारतातील अतिशय लोकप्रिय फळ आहे. याला ‘अँपल ऑफ द पुअर’ असेही म्हणतात. पेरूमध्ये जीवनसत्त्वे, लोह, फॉस्फरस सह अनेक खनिज घटक असतात. पेरू लागवडीचा खर्च खूपच कमी असल्याचे दिसून येते. त्यामानाने यातून नफा जास्त काढता येऊ शकतो.

पेरू लागवडीची पद्धत
हवामान
पेरू लागवडीसाठी उष्ण व कोरडे हवामान लागते. पेरूचे चांगले उत्पादन घेण्यासाठी १५ ते ३० सेंटीग्रेड तापमानाची आवश्यकता असते. त्यावर हवामानातील चढ-उताराचा कोणताही परिणाम होत नाही.

माती
साधारणपणे पेरूची लागवड कोणत्याही जमिनीत करता येते. जमिनीचा पीएच ६ ते ७.५ असावा

लागवड
पेरूची पेरणी फेब्रुवारी ते मार्च किंवा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान केली जाते. पेरूच्या बियाणे पेरण्याबरोबरच रोपे लागवड करूनही त्याचे उत्पादन घेता येते. लागवडीदरम्यान रोपे ६ बाय ५ मीटर अंतरावर ठेवली जातात, जेणेकरून त्याच्या फांद्या पसरण्यास चांगली जागा मिळू शकेल. एक एकर क्षेत्रात सुमारे १२० झाडे लावता येतात.

तण नियंत्रण
पेरूच्या रोपांच्या आजूबाजूच तण काढत राहावे लागते. लागवडीनंतर साधारण २५ ते ३० दिवसांनी खुरपणी करावी. तण नियंत्रणासाठी ग्रॅमोक्सोन पाण्यात मिसळून रोपांवर शिंपडावे. पेरूची झाडे वाढल्यावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतात नांगरणी करावी जेणेकरून तेथे असलेले तण नष्ट होतील.

खते
पेरूच्या रोपांसाठी तयार केलेल्या खड्ड्यात ३०० ते ४०० ग्रॅम कुजलेले शेणखत टाकावे. त्याचबरोबर कडुनिंब, युरिया, पोटॅश यांसारखी रासायनिक खते योग्य प्रमाणात वापरावीत. झाडाला ५० ग्रॅम नायट्रोजन, ३० ग्रॅम गंधक आणि ५० ग्रॅम पोटॅश घाला.

कमाई
एकदा पेरूची रोपे उगवली की ती २० वर्षे फळे देत राहतात. पेरूची रोपे हेक्टरी १० ते १५ टन उत्पादन घेऊ शकतात. बाजारात पेरूला मोठी मागणी आहे. त्याची लागवड केल्यास प्रतिहेक्टरी प्रत्येक हंगामात २ ते ३ लाखांचे उत्पन्न सहज मिळू शकते.

ताज्या बातम्या

सरकारी योजना