आर्थिकPUNE : पुण्यामधील शेतकऱ्याने काकडीच्या उत्पादनातून 20 गुंठ्यांत कमावले 2 लाख रुपये

PUNE : पुण्यामधील शेतकऱ्याने काकडीच्या उत्पादनातून 20 गुंठ्यांत कमावले 2 लाख रुपये

spot_img
spot_img

सध्या शेतकऱ्यांनी शेतीत अनेक प्रयोग करून पिके घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतीक्षेत्रात दिवस बदलत आहेत. नोकरी न करता वेगवेगळी पिके घेऊन चांगले उत्पादन कसे मिळवता येईल, तसेच नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवता येईल, याकडे अनेक उच्चशिक्षित तरुण लक्ष देत आहेत. पुण्याजवळील बारामतीमधील श्रीकांत काकडे यांनी शेतीतून अनेक पिके घेऊन चांगले उत्पन्न मिळवले आहे. त्यांनी 2 महिन्यात 20 गुंठ्यांत काकडी लागवडीतून 2 लाखांचा नफा मिळवला आहे.

काकडी हे उष्ण व कोरड्या हवामानात वाढणारे पीक आहे. पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते अवजड जमीन या पिकासाठी योग्य आहे. काकडीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात होत असते. उन्हाळ्याच्या हंगामात जानेवारी महिन्यात काकडीची लागवड केली जाते.

बारामती तालुक्यातील निंबुत येथील उच्चशिक्षित तरुण शेतकरी श्रीकांत रामदास काकडे (वय २६) यांनी जानेवारी महिन्यात आपल्या वीस गुंठे शेतजमिनीत चार फूट पट्टा पद्धतीने व संपूर्ण मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाने ‘सागर’ जातीच्या काकडीची लागवड केली. आणि आज त्यांनी त्यातून भरपूर उत्पन्न कमावले आहे.


अशा प्रकारे वाढले उत्पन्न
श्रीकांत काकडे यांनी आपल्या 20 गुंठे शेती क्षेत्रात काकडीची लागवड केली आहे. खरं तर हे पीक 30 दिवसांत सुरू झालं. तारकटीच्या साहाय्याने वेळ बांधणी, दोन ते तीन औषधी फवारण्या, दोन खुरपणी आदी या पिकासाठी केले जाते. श्रीकांत यांनी हे सर्व केले.

20 गुंठ्यांत काकडीचे 7 टन उत्पादन
सुमारे वीस गुंठ्यांत किमान तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च झाला. ढगाळ हवामान आणि थंडीमुळे उत्पादनात घट झाली असली तरी श्रीकांतने २० गुंठ्यांत 7 टन उत्पादन घेतले. काकडीचा दर सरासरी 28 रुपये किलो मिळाला असून वीस गुंठ्यांत दोन लाखांच्या आसपास नफा मिळाला आहे.

60 दिवसांत 20 गुंठ्यांत पावणेदोन लाखांचा नफा
श्रीकांतने काकडी लागवड करण्याचे ठरविले. त्यानंतर काकडी पिकाची संपूर्ण माहिती मिळवली. त्याआधारे त्यांनी संपूर्ण खर्च जाता 20 गुंठ्यांत 1 लाख 70 हजार रुपयांचा नफा कमावला. 60 दिवसांच्या कालावधीत काकडीपासून निव्वळ नफा कमावून श्रीकांत यांनी शेतीतून अल्पावधीत अनेक हंगामी पिके घेऊन झटपट पैसे कसे मिळवता येतात हे दाखवून दिले आहे.
पपईपासूनही झाला लाखो रुपयांचा नफा
श्रीकांत यांना शेतीत हंगामी पिके घेण्याची सवय असल्याने त्यांनी यापूर्वी पपई, आले अशी पिके घेतली आहेत. संपूर्ण क्षेत्र ड्रीप इरिगेशन करून दोन्ही बेडच्या मध्ये आंतरपीक म्हणून 15 नंबर या जातीच्या पपईची लागवड केली होती. पपई हे नऊ महिन्यांचे पीक आहे. आल्याचे एकरी उत्पादन 20 टनांपेक्षा अधिक निघाले.

सध्याच्या बाजारभावानुसार भाव 40 ते 45 रुपये होता. त्यात उत्पादन 9 ते 10 लाखांच्या आसपास निघाले. आणि पपईचे एकरी उत्पादन 60 ते 70 टनांच्या आसपास गेले. सध्या बाजारभाव 30 ते 40 रुपये किलोच्या आसपास आहेत. एकरी उत्पादन सुमारे 28 लाख होते. आले व पपई या दोन्ही पिकांपासून एका वर्षामध्ये 37 लाखांच्या आसपास उत्पादन मिळाले.

ताज्या बातम्या

सरकारी योजना