बातम्यापीएम किसान योजनेचे पैसे मिळवण्यात अडचणी येतायत ? 'येथे' करा संपर्क

पीएम किसान योजनेचे पैसे मिळवण्यात अडचणी येतायत ? ‘येथे’ करा संपर्क

spot_img
spot_img

मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना करत असते. याच अनुशंघाने शेतकऱ्यांसाठी केंद्राने पीएम किसान योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये पाठवते. दरम्यान सध्या अनेकांना या योजनेतील पैसे मिळवण्यासाठी अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. तुम्हालाही अडचण आली तर कोठे संपर्क करावा? चला जाणून घेऊयात

कधी येणार 13 वा हप्ता?
शेतकऱ्यांच्या खात्यावर आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचा 13 वा हप्ता येणार आहे. हा हप्ता शक्यतो 31 जानेवारीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो असे सांगितले जात आहे. शेतकरी सध्या आगामी हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे जर 31 जानेवारीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले तर शेतकऱ्यांना मोठा हातभार लागणार आहे.

अडचण आल्यास कुठे संपर्क करावा?
अनेकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याबाबत अडचणी येण्याची शक्यता आहे. किंवा या आधी देखील अडचणी आल्या असतील. यासाठी जर तुम्हाला काही माहिती किंवा मदत लागली तर शेतकरी अधिकृत ईमेल आयडी [email protected] वर संपर्क साधू शकतात. त्याचप्रमाणे हेल्पलाइन नंबर देखल आहे. 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 हे हेल्पलाइन नंबर आहेत. यावर देखील संपर्क साधू शकता.

ताज्या बातम्या

सरकारी योजना