बातम्याफिलिपाइन्समध्ये कांद्याला मिळतोय ९०० रुपये किलो भाव

फिलिपाइन्समध्ये कांद्याला मिळतोय ९०० रुपये किलो भाव

spot_img
spot_img

सध्या महागाईने भारत देशाचेच नव्हे तर इतर देशांत देखील सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. एका वृत्तानुसार फिलिपाइन्समध्ये कांद्याला 900 रुपये भाव मिळत आहे. एक किलो कांद्याची किंमत सुमारे $11 म्हणजेच 900 रुपये आहे.

म्हणजेच येथे कांदा चिकनपेक्षा जवळपास तिप्पट महाग आहे. वाढत्या किमतींमुळे, फिलीपिन्सच्या कृषी अधिकाऱ्यांनी देशांतर्गत पुरवठ्यासाठी मार्चपर्यंत सुमारे 22,000 टन कांद्याची आयात करण्याची घोषणा केली आहे. कांद्याच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे फिलीपिन्स सरकार चिंतेत आहे. फिलीपिन्समध्ये कांदा हा मुख्य खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे फिलिपाइन्समध्ये कांद्याची तस्करी सुरू झाली आहे. अलीकडेच चीनमधून तस्करी केलेल्या कांद्याची एक खेप फिलिपाइन्सच्या कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केली होती. हा कांदा चीनमधून पेस्ट्री बॉक्‍समध्ये लपवून भारतात नेला जात होता

किमती वाढण्यामागे काय आहेत कारणे ?
टाईम मॅगझिननुसार, जागतिक महागाई, हवामानातील बदल यासह किंमती वाढण्यामागे अनेक कारणे असल्याचे मानले जाते. त्यामुळे गेल्या 14 वर्षांत फिलीपिन्समध्ये महागाईचा दर 8.1 टक्क्यांनी वाढला असून कांदा 0.3 टक्क्यांनी महागला आहे. देशातील कृषी प्राधिकरणाने मार्च महिन्यापर्यंत 22000 टन भाज्यांचा पुरवठा करण्याची घोषणा या आठवड्यात केली आहे. फिलिपिन्सचे अध्यक्ष बोंगबोंग मार्कोस यांनी पुरवठ्यातील तुटवड्याबद्दल सांगितले की त्यांनी कांद्याची किंमत 600 पेसोवरून 250 पेसोपर्यंत कमी करण्याचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

सरकारी योजना