बातम्यानाशिक पाठोपाठ अहमदनगरमध्येही कांद्याचे भाव घसरले, पहा किती कांद्याची होतेय आवक अन...

नाशिक पाठोपाठ अहमदनगरमध्येही कांद्याचे भाव घसरले, पहा किती कांद्याची होतेय आवक अन बाजारभाव

spot_img
spot_img

कांद्याचे दर सातत्याने घसरत आहेत. महाराष्ट्रातील नाशिकपाठोपाठ अहमदनगरमधील शेतकऱ्यांनाही कांद्याला चांगला भाव मिळत नाही. बाजारात दररोज ६० हजार ते १ लाख क्विंटल कांद्याच्या गोण्यांची आवक होत आहे. भाव इतका घसरला आहे की, शेतकऱ्याला त्याच्या पिकाचा खर्चही वसूल करता आलेला नाही.

शेतकऱ्यांना खर्चही वसूल करता आलेला नाही
अहमदनगरमधील वैभव कराळे या तरुण शेतकऱ्याने नोकरी सोडून कांदा लागवडीत हात आजमावला. एक एकरात कांद्याची पेरणी झाली. त्यांना यासाठी एक लाख रुपये खर्च आला होता. बाजारात ४० गोण्या विकल्यानंतर त्यांना ८००० रुपये मिळाले. कांद्याच्या ४० गोण्या अजूनही शेतात पडून आहेत. खर्च निघत नाही. अशा परिस्थितीत कांदा पिकाला योग्य भाव मिळत नसल्यास अनुदान देण्याची मागणी वैभव यांनी केली आहे.

एवढ्या किमतीत विकला जात आहे कांदा
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार, बाजारात दररोज ६० हजार ते १ लाख क्विंटल कांदा गोण्या येत आहेत. एक नम्बर कांद्याला एक हजार रुपये, दोन नम्बर कांद्याला सातशे रुपये, तीन नम्बर कांद्याला पाचशे रुपये आणि चार नम्बर कांद्याला २५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

कांद्याचे दर का घसरले?
महाराष्ट्रातील कांदा गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात विकला जातो. यंदा या सर्व राज्यात कांद्याचे पीक चांगले आले आहे. यामुळेच महाराष्ट्रात सर्वत्र कांद्याच्या दरात मोठी घसरण नोंदवली जात आहे.

ताज्या बातम्या

सरकारी योजना