बातम्याशेतकऱ्यांनो खुशखबर ! पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये 'या' तारखेपूर्वी येणार

शेतकऱ्यांनो खुशखबर ! पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये ‘या’ तारखेपूर्वी येणार

spot_img
spot_img

शेतकऱ्यासांठी मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दोन दोन हजार रुपयांचा हप्ता मिळत असतो. आता या योजनेचा 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. एका वृत्तानुसार, 13 वा हप्ता 31 जानेवारीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो असे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 जानेवारीला ‘मन की बात’ करणार आहेत. त्या दिवशी पीएम किसान योजनेची रक्कम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ई-केवायसी नसेल तर मिळणार नाहीत पैसे
ई-केवायसी करण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. शेतकऱ्यांना याबाबत सातत्याने सूचना केल्या जात आहेत. जर तुम्ही ई-केवायसी केले नाही, तर तुम्ही 13व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता. पुढील हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी, शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

लाभार्थी यादीतील नाव पहा
पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर Farmer Corner वर क्लिक करा. येथे लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासा. प्रथम येथे ई-केवायसी आणि जमिनीचे तपशील पूर्णपणे भरलेले आहेत का ते तपासा. जर पीएम किसान योजनेच्या स्टेटसच्या पुढे होय लिहिले असेल तर समजा 13वा हप्ता तुमच्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल. दुसरीकडे, यापैकी कोणत्याही ठिकाणी ‘नाही’ लिहिलेले नसेल, तर तुमचा हप्ता थांबू शकतो.

अडचण आल्यास कुठे संपर्क करावा?
अनेकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याबाबत अडचणी येण्याची शक्यता आहे. यासाठी जर तुम्हाला काही माहिती किंवा मदत लागली तर शेतकरी अधिकृत ईमेल आयडी [email protected] वर संपर्क साधू शकतात. त्याचप्रमाणे हेल्पलाइन नंबर देखल आहे. 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 हे हेल्पलाइन नंबर आहेत. यावर देखील संपर्क साधू शकता.

ताज्या बातम्या

सरकारी योजना