'या' फुलांना मार्केटमध्ये असते वर्षभर मागणी,मिळेल पैसाच पैसा
आज शेतकरी बांधव फुलशेतीकडे वळला आहे.
काही फुलांना वर्षभर मागणी असते.त्यातून चांगले पैसे मिळू शकतात
गुलाब : गुलाबाला वर्षभर मागणी असते. त्याचा भावही चांगला टिकून असतो. यातून चांगले उत्पन्न मिळू शकते
झेंडू : विविध सण-उत्सव ,समारंभ हे वर्षभर सुरु असतात. त्यामुळे या फुलाला वर्षभर मागणी असते. दिवाळी,दसऱ्याला याला विशेष भाव असतो
जरबेरा : जरबेराचा उपयोग मुख्यत्वे लग्न समारंभ, सजावट तसेच बुके मध्ये केला जातो. हे फुल सिंगल पीस मध्ये देखील विकले जाते. याची किंम खूप जास्त असल्याने त्यातून प्रॉफिट देखील चांगला मिळतो.
मोगरा : मोगऱ्याच्या फुलांना वर्षभर मागणी असते. गजऱ्यांपासून तर महिलांच्या अनेक शृंगारिक गोष्टींमध्ये याचा वापर होतो. तसेच या फुलांना भाव देखील जास्त असल्याने आर्थिक दृष्टया परवडणारे असते.
ऑर्किड : ऑर्किडचे महत्त्व सौंदर्य आणि सजावट यात आहे. काही फुलांमधून परफ्यूम देखील मिळतो. त्यामुळे याला देखील मागणी असते.